राज्यात अनेक भागात एसटी सेवा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मुंबई : एसटी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. २५) राज्यभरात निदर्शने केली. महामंडळाने बुधवारी घेतलेल्या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे कामगारांनी शुक्रवारी संपूर्ण राज्यात निदर्शने केल्याने दिवाळीच्या काळात काही मार्गांवरील एसटी सेवा विस्कळित झाली.

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आदी सर्व विभागांत राज्य एसटी कामगार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दिवाळीपूर्वी ३ टक्के महागाई भत्ता थकबाकी, ऑक्‍टोबरचे वेतन आणि सानुग्रह अनुदान द्यावे. त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर कामगारांना १२ हजार ५०० रुपये सणासाठी उचल द्यावी, अशा मागण्या एसटी कामगारांनी केल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disrupted ST services in many areas of the state