महापारेषणच्या पडघा उपकेंद्रात बिघाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power cut

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रात बिघाड

डोंबिवली - महापारेषणच्या पडघा उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी डोंबिवली, अंबरनाथ, जांभूळ, पाल, आनंद नगर, मोहन, शहापूर, मुरबाड, पडघा आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. एक तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. केंद्रावरील सस्पेंशन स्ट्रिंग तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बिघाड दुरुस्त करत वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला.

वारा, पाऊस नसतानाही रविवारी दुपारी 1 च्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणच्या पडघा येथील उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने डोंबिवली, पलावा, अंबरनाथ सह शहापूर, मुरबाड, पडघा, जांभूळ आदी भागातील बत्ती गुल झाली. शहरात पावसाचे वातावरण असले तरी पावसास अद्याप सुरवात झाली नसल्याने दमट वातावरण आहे. आधीच घामाच्या धारा वहात असताना भर दुपारी लाईट गेल्याने नागरिक आणखी हैराण झाले.

सुट्टीचा दिवस असल्याने काही जण आराम करत होते, तर काहींचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्यांना कामात अडचनी आल्या. वीज पुरवठा खंडित होताच अनेक रहिवाशांनी महावितरणच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. तेथील मोबाईलही सतत व्यस्त लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुपारी एक वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी 2 वाजता सुरू झाला. कल्याण पश्चिम भागात अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास लाईट आली आणि परत गेली, ती दुपारी 5 वाजले तरी आली नसल्याने नागरिक हैराण झाले होते.

पडघा येथे उपकेंद्र असून येथून डोंबिवली, अंबरनाथ, जांभूळ, पाल, आनंद नगर, मोहन, शहापूर, मुरबाड, पडघा आदी भागाला वीज पुरवठा होतो. रविवारी दुपारी 1 च्या सुमारास येथे तांत्रिक बिघाड झाल्याने 1 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. तत्काळ हा बिघाड दुरुस्त करत वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यात आला आहे.

- महेंद्र ‌वाळके, मुख्य‌ अभियंता, वाशी‌ परिमंडळ,‌ महापारेषण.

Web Title: Disruption In Padhaga Substation Of Mahatrans

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top