शासकीय योजनांच्या शिबीरात विविध विभागांचे दाखले वाटप 

 मुरलीधर दळवी
शुक्रवार, 11 मे 2018

मुरबाड (ठाणे) : महाराष्ट्र शासन संपुर्ण सेवा अभियान व विस्तारीत स्वरुपातील समाधान योजना महाशिबीराचे मुरबाड तहसील कार्यालयात शुक्रवारी 11 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयानी सहभाग घेऊन नागरिकांना लागणारे दाखले वाटप केले. 

शिबिराची सुरुवात मुरबाड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश रेडकर यांचे हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आली. 

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर हे दोन तालुके आदिवासी बहुल व पेसा योजनेत येत असल्याने शासनाने या तालुक्यातील नागरिकांना विविध कारणासाठी लागणारे दाखले एकाच दिवसात मिळावेत यासाठी संपुर्ण सेवा अभियान व विस्तारीत स्वरुपातील समाधान योजना महाशिबीराचे मुरबाड तहसीलदार कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरात वनविभागाचे वतीने घरगुती गॅसचे वाटप, वन्यप्राण्याकडून झालेली नुकसान भरपाई देण्यात आली, जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आठ वनव्यावस्थापन समित्यांना फायर ब्लोअर यंत्र वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे दोनशे ग्रीन आर्मी सदस्यांची नोंदणी करण्यात आली. 

महसुल विभागाकडून नागरिकांना उत्पन्नाचे, जातीचे 550 दाखले  वाटप करण्यात आले. तर पशुधन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये कुकुट पालनासाठी कोंबडीचे वाटप केले परिवहन विभागाने 85 शिकाऊ परवाने दिले. 

या शिबिरास, मुरबाडचे तहसिलदार सचिन चौधर, नायबत हसिलदार हनुमंत जगताप, उपवनसंरक्षक कुंभार, वनक्षेत्रपाल रमेश रसाळ, संजय चन्ने, तालुका पशुधन अधिकारी चंदनशिवे आदी अधिकारी उपस्थित होते. शिबिरात नागरिकांनी दाखले घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title: distribution of documents in government scheme camp