Raj Thackeray Birthday : वाहनचालकांसाठी गुड न्यूज! आज 55 रुपयांत मिळतंय पेट्रोल; कुठं ते जाणून घ्या..

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे.
Raj Thackeray Birthday
Raj Thackeray Birthdayesakal
Summary

राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणासारखा असून त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर उपाय म्हणून आम्ही 55 रुपयात पेट्रोल वाटप करत असल्याचं मनोज शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

डोंबिवली : पेट्रोलचे भाव (Petrol Prices) वाढलेले असताना उल्हासनगरमधील वाहनचालकांना मात्र आज यातून दिलासा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.

मनसे विद्यार्थी सेनेने (MNS Student Sena) आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.

Raj Thackeray Birthday
Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगरमधील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी नागरिकांना अवघ्या 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे.

Raj Thackeray Birthday
Cyclone Biparjoy Alert : चक्रीवादळात स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या काही उपाय

यासाठी नागरिकांना कूपन वाटप करण्यात येत असून प्रत्येक नागरिकाला 1 लिटर याप्रमाणे 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत, पेट्रोल भरण्यासाठी सकाळ पासून रांगा लावल्या आहेत. सकाळपासून पावसाचे वातावरण असताना त्याची तमा न बाळगता चालक आपल्या गाडीत पेट्रोल भरून घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.

Raj Thackeray Birthday
Road Accident : चिपळूण-कराड महामार्गावरुन प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..

पेट्रोल पंपाच्या बाहेरपर्यंत वाहन चालकांच्या रांगा लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणासारखा असून त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर उपाय म्हणून आम्ही 55 रुपयात पेट्रोल वाटप करत असल्याचं मनोज शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com