

Latest Kalyan News | दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दीतून मुक्तता होणार आहे.
दिवा रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी लोकलने मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल, वसई येथे आपल्या नियमित कामासाठी प्रवास करतात. दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट प्रकल्प राबविण्यात आला होता.
Diva Railway