डोंबिवली- दिवा स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची गर्दी होत असून वाहन कोंडी होत आहे. या वाहनकोंडीत रुग्णवाहिका अडकून पडत आहेत. ठाणे पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी दिवा चौक येथे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केले. भाजप पदाधिकारी यांनी तब्ब्ल पाऊण तास रास्ता रोको केला. यावेळी भाजपा सोबत सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष दिसून आला नाही. यावर मित्रपक्ष असून सुद्धा तो आमच्यासोबत नाही खेदाची बाब असल्याचे भाजप दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले.