मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

मुंबई - जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असताना मुंबईतील संसर्गात महिलांपेक्षा पुरुषांना कोरोना होण्याची संख्या जास्त आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेत ही बाब समोर आली आहे. शिवाय, मुंबईकर महिलांची रोग प्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा जास्त असल्याचेही या सर्व्हेतुन समोर आले आहे. 

मुंबई महापालिकेने केलेल्या सर्व्हेत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँटीबॉडीज अधिक असल्याचं निरीक्षणातून समोर आलं आहे. मुंबईत 45 टक्के महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पुरुषांमध्ये हे प्रमाण 55 टक्के इतकं आहे. दरम्यान, सर्व वयोगटातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. 

  • पालिकेने तीन वॉर्डमध्ये केलेल्या सिरो सर्व्हेत अनेक लोकांमध्ये कोविड 19 विरोधात तयार झालेल्या अँटीबाॅडीज आढळून आल्या.
  • सर्व्हेत 59.3 टक्के म्हणजेच 2 हजार 297 महिलांमध्ये अँटीबाॅडीज आढळल्या
  • 1,937 पुरुषांमध्ये 53.2 टक्के अँटीबाॅडीज तयार झाल्या

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँटीबाॅडीज जास्त आढळल्या. शिवाय, महिलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे आणि त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाण ही अगदी कमी आहे. मात्र, असे जरी असले तरी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँटीबाॅडीज जास्त आढळल्या आहेत. मात्र, या निरीक्षणाबाबत अभ्यास करावा लागेल असं तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. TIFR, निती आयोग आणि पालिकेने मिळुन हा सिरो सर्व्हे केला आहे. 

महिलांना कोरोनाचा संसर्ग होण्यामागे त्या आजुबाजुला फिरण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे झाला असू शकतो असं सांगण्यात आले आहे. 

पालिकेच्या तीन वॉर्डच्या अहवालानुसार, तिन्ही वॉर्डमध्ये सारखीच आकडेवारी पाहायला मिळाली. दरम्यान, झोपडपट्टी रहित भागांमध्ये 16 टक्के सिरो पॉझिटिव्ह रेट, एफ उत्तर भागातील माटुंगा आणि वडाळा या भागात 58 टक्के सिरो पॉझिटिव्ह रेट, एम पश्चिम 57 टक्के आणि आर उत्तर वॉर्डमध्ये 51 टक्के सिरो पॉझिटिव्ह रेट आढळला आहे. 

कोरोना मृत्यू निरीक्षण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनीही याबाबत आपलं मत मांडलंय. हा अहवाल नक्कीच आशादायी आहे. झोपडपट्टी भागात 57 टक्के अँटीबाॅडीज आढळल्या आहेत. म्हणजेच याचा अर्थ हर्ड इम्युनीटीकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे.

मात्र, या अहवालात महिलांना जास्त इम्युनीटी झाल्याचे आढळले आहे. याची कारणमीमांसा झाली पाहिजे आणि सखोल अभ्यास झाला पाहिजे. अहवालाचा ही अभ्यास झाला पाहिजे. महिलांमध्ये जास्त इम्युनीटी आहे का? त्यांच्या घरी कोणाला कोरोना झाला होता का? या सर्वाचा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हाच त्याचे नेमके कारण कळू शकेल, असं  डॉक्टर सुपे म्हणालेत.  

( संपादन - सुमित बागुल )

women are more immune to covid19 than men sero survey reviled vital information

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com