दिवाळीच्या उत्सवात मुंबईत अग्नितांडव! कुठे इमारतीला आग, तर कुठे दुकानं जळून खाक; मुंबई-ठाण्यात कुठे काय घडलं?

Mumbai Fire Incidents: दिवाळीच्या जल्लोषात मुंबई-ठाण्यात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत तब्बल ८९ आगीच्या घटनांची नोंद झाल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mumbai Fire Incidents

Mumbai Fire Incidents

ESakal

Updated on: 

मुंबई : दिवाळीच्या उत्सवामुळे मुंबईत आगीच्या घटनांचे संकट ओढवले असून, अवघ्या दोन दिवसांत शहरात ८९ आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी २८ घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत. अंधेरी पश्चिम भागात उत्सवाच्या धामधुमीत एक दुर्दैवी घटना घडली, जिथे एका उंच इमारतीच्या १७ व्या मजल्यावर लागलेल्या आगीदरम्यान लिफ्टमध्ये अडकल्यामुळे ५६ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा गुदमरून मृत्यू झाला. अपार्टमेंटमधील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...