

Mumbai AQI
ESakal
मुंबई : न्यायालयीन निर्बंध आणि महापालिकांचे आवाहन धुडकावून लक्ष्मीपूजनाला झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईसह महामुंबई परिसर प्रदूषणाने झाकोळले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अनेक ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची खराब ते गंभीर श्रेणी नोंदवली गेली. महापालिकांच्या आकडेवारीनुसार, ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५०, तर मुंबईत वांद्रे रेक्लमेशन आणि कलानगर येथे २३१ इतका नोंदविण्यात आला. वांद्रे पूर्व येथे निर्देशांक सर्वाधिक २८४ होता. त्याचबरोबर फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली.