
Diwali Firecrackers
ESakal
मुंबई : दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या अनेक फटाक्यांतून घातक विषारी जड धातू बाहेर पडत असल्याचे निरीक्षण आवाज फाउंडेशनच्या चाचणीतून समोर आले आहेत. या विषारी घटकातून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. या विषारी फटाक्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नियंत्रित करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे, असे आवाज फाउंडेशनकडून सांगण्यात आले.