
Diwali Season danger to animals due to firecrackers
ESakal
मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा उत्सव, पण या उत्साहाच्या दरम्यान आपल्या आजूबाजूला असणारे पशु-पक्षी मात्र फटाक्यांच्या आवाजाने त्रस्त होतात. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे अनेक प्राणी घाबरून पळून जातात, जखमी होतात आणि मृत्युमुखीही पडतात.