महिला बचत गटांचा दिवाळी फराळ

महिला बचत गटांचा दिवाळी फराळ
महिला बचत गटांचा दिवाळी फराळ

नवी मुंबई : ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यामुळे अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी सर्वांचीच फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. याच संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटदेखील पुढे सरसावले आहेत.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने फराळाच्या पदार्थांचा सुगंध सध्या सगळीकडे दरवळत आहे. दिवाळीत बहुतेक पदार्थ घरी बनवले जातात. मात्र, सध्याच्या धकाधूकीच्या जीवनात काही नोकरदार महिलांना फराळ बनवणे शक्‍य नसते. त्यामुळे त्यांची पावले रेडिमेड खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे वळतात. त्यामुळे आता महिला बचत गटांनी फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याने दुकानांमधून फराळ घेण्यापेक्षा बचत गटांतील महिलांकडून फराळ घेण्यासाठी रीघ लागली आहे. दर्जेदार आणि खमंग पदार्थ बचत गट दुकानापेक्षा स्वस्तात देतात. त्यामुळे ग्राहकही हे पदार्थ घ्यायला पसंती देत आहेत. आर्थिक नफाही होत असल्यामुळे बचत गटातील महिलाही समाधानी आहेत.

सद्यस्थितीमध्ये नोकरदार महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नोकरी सांभाळून दिवाळीचे फराळ करणे नोकरदार महिला वर्गाला शक्‍य होत नाही. त्यामुळे नोकरदार महिला वर्गाचा कल रेडीमेड फराळ घेण्याकडेच असतो. ऑफिसमधून सुट्टी न मिळाल्यामुळे महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही.

दिवाळी फराळास नोकरदार महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाददेखील मिळत आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामामुळे दोन पैसे मिळत असल्याने कौटुंबिक हातभारदेखील लागत आहे.
- रंजना रोडे, जाईजुई महिला बचत गट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com