नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी

नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मालामाल केले. कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त देण्यात येणारा बोनस (सानुग्रह अनुदान) आणि उत्सवानिमित्ताने देण्यात येणारी उचल या दोन्ही रकमा अवघ्या दहा दिवसांच्या फरकाने बॅंक खात्यावर जमा केल्या. तसेच २५ तारखेपासून दिवाळी सुरू होत असल्याने, वेतनही पुढील एक ते दोन दिवसांत बॅंक खात्यावर जमा होणार असल्याने पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात साजरी होणार आहे.

महापालिकेतर्फे कायम आस्थापनेवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये, परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये, पालिकेच्या कंत्राटी कामगारांना १९ हजार रुपये, आशा लिंक कामगारांना ९ हजार रुपये बोनस जाहीर केले. ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर बहुतांश कर्मचारी व अधिकारी निवडणूक कर्तव्यावर कामाला जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी. यासाठी पालिकेने ११ ऑक्‍टोबरलाच बोनसची रक्कम बॅंक खात्यावर जमा केली. त्याच्या पाच दिवस आधी निवडणुकीच्या कामाला जाण्याआधी कर्मचाऱ्यांना उत्सवानिमित्ताने देण्यात येणारी उचलची सुविधा देण्यात आली. 

पालिकेने एनएमएमटीच्या अडीच हजार कामगारांना बोनसवर ५ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम जमा केली; तर कायम आस्थापनेवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांना बोनस पोटी तब्बल ८ कोटी ९८ लाख रुपये अदा केले; तर १३ लाख १७ हजार रुपयांची उचल कामगारांना वाटप करण्यात आली. याखेरीज आता निवडणूक संपणार असल्याने निवडणुकीवरील कर्तव्य बजावून पुन्हा माघारी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यावरही पुढील एक ते दोन दिवसांत वेतनाची रक्कम जमा होणार आहे. 

एनएमएमटीचे कर्मचारी मालामाल
पालिकेने एनएमएमटीच्या अडीच हजार कामगारांना बोनसवर ५ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम जमा केली; तर कायम आस्थापनेवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांना बोनस पोटी तब्बल ८ कोटी ९८ लाख रुपये अदा केले; तर १३ लाख १७ हजार रुपयांची उचल कामगारांना वाटप करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com