
Thane Traffic Route Change
ESakal
ठाणे : दिवाळी पहाटनिमित्त २० ऑक्टोबर रोजी ठाण्यातील नौपाडा परिसरात विविध संस्थांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्या दिवशी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.