diwali return mumbai goa highway traffic

diwali return mumbai goa highway traffic

ESAKAL

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव जवळ वाहतूक ठप्प आहे. मागील दीड तासांपासून वाहने अडकली आहेत.
Published on

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

विशेषतः माणगाव आणि इंदापूर भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील दीड तासांपासून वाहने अडकून पडली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com