पुनर्वसनाआधी घरांना हात लावू नका; रामदास आठवले यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ते टिटवाळादरम्यान मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत रिंगरोड बनविण्यात येणार आहे. यामध्ये हजारो नागरिकांची घरे बाधित होणार असून त्यांचे पुर्नवसन केल्याशिवाय घरांना हात लावू नका, असे आदेश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ते टिटवाळादरम्यान मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत रिंगरोड बनविण्यात येणार आहे. यामध्ये हजारो नागरिकांची घरे बाधित होणार असून त्यांचे पुर्नवसन केल्याशिवाय घरांना हात लावू नका, असे आदेश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

गुरुवारी (ता. २०)  एमएमआरडीएच्या मुंबई येथील कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आरपीआय (आठवले गट) राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, जालिंदर बर्वे, नलिनी साळवे, अशोक खैरे, दादा कांबळे, सुवर्णा पाटील; तसेच एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

ही बातमी वाचा ः 90 रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा

एमएमआरडीएमार्फत दुर्गाडी किल्ला ते टिटवाळा असा महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्प करण्यात येणार आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भूसंपादन करणार आहे. या प्रकल्पात ८६६ घरे बाधित होणार असून यातील ५९० घरे अटाळी, आंबिवली, टिटवाळ्यातील आहेत. मात्र पालिकेने पुनर्वसनाबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन न दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी २६ जानेवारी रोजी पालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता. 

पंधरा दिवसात अहवाल सादर करा
बैठकीत अधिकाऱ्यांनी रिंगरोड प्रकल्पाची दिली. या वेळी आठवले यांनी अधिकाऱ्यांना प्रकल्पात किती घरे बाधित होतात याची आकडेवारी काढाण्याचे; तसेच पुनर्वसनासाठी पात्र-अपात्रांची यादी येत्या १५ दिवसांत बनवून अंतिम अहवाल बनवून सादर करण्याचे आदेश दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not touch houses before rehabilitation; Order by Ramdas Athawale