९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

मुंबई - राज्य सरकारने थायी मागुर माशांचं उत्पादन करणाऱ्या केंद्रांबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने थायी मागुर माशांच्या उत्पादन केंद्रांवर बंदी घातलीय. थायी मागूर मासा हा जलप्रदुषणासाठी आणि लोकांमध्ये कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणासाठी कारणीभूत ठरतो. म्हणूनच सरकार या माशाची लवकरात लवकर विल्हेवाट देखील लावणार आहे. या माशांची शेती करणाऱ्या केंद्रांवरही बंदी घालण्यात आली आहे. 

मोठी बातमी -  'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...
 
थायी मागुर मासा हा जलप्रदुषणासाठी आणि लोकांमध्ये कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणासाठी कारणीभूत ठरतो आणि त्यामुळेच या माशांच्या उत्पादनावर २००० साली बंदी घालण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी हा माशाची अनधिकृतरित्या ही शेती करण्यात येत होती. त्यामुळे ही उत्पादन केंद्र आता बंद करण्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येत आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत राज्यभरात तब्बल ३२ टन माशांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यात २ टन भंडारा जिल्ह्यातून, १५ टन भिवंडीतून, ८ टन इंदापूरमधून तर ६ टन शिक्रापुरमधून अशी या माशांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. अजूनही काही भागात या माशांची विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे. 

मागुर या माशाला मागर, मागुरी, वाघूरी या वेगवेगळ्या नावाने ही ओळखलं जातं. यातील थायी मागुर या माशावर सरकारने बंदी घातली आहे. क्‍लारीअस बॅट्राशस असं या माशाचं इंग्रजी नाव आहे. थायी मागुरचं सेवन आरोग्यास तसेच पर्यावरणास ही हानिकारक असल्याने केंद्र सरकारने 2000 साली या माशाच्या सेवन आणि विक्रीस बंदी घातली. केंद्रानंतर राज्य सरकारने ही बंदी घातली असुन ती आज ही कायम आहे.

मोठी बातमी -  म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

मागुर माशाच्या विक्रीवर बंदी असून ही मुंबईतील काही भागात त्याची अवैध विक्री सुरू आहे. खासकरुन दादार मार्केट परिसरात दक्षिण मुंबईच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर हा मासा विकला जात आहे. पहाटे दादर मार्केट परिसरात अनधिकृतपणे मांगूर मासाचे 7-8 ट्रक उभे करून दलालांच्या माध्यमातून या माशांची विक्री केली जाते. मासळी बाजारात हा मासा 90 ते 130 रुपये किलो दराने विकला जातो. मुंबईसह रायगड, पालघर आणि पुण्यामध्ये या माशांची अवैध विक्री केली जाते. 

थायी मागूर माशाची वैशिष्ट्ये 

थायी मागुर मासा पाण्याव्यतिरिक्त तसेच चिखलात जिवंत राहतो. मागूर माशाची लांबी साधारणता एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत असते.

मागुर माशाच्या मानेजवळ विषारी काटे असतात. तो स्वभावाने आक्रमक असून विचित्र सवय असणारा मासा अशी ही त्याची ओळख आहे. 

मोठी बातमी - लव्ह, टॅटू, धोका... आणि मग...

थायी मागूरमुळे कॅन्सरचा धोका 

थायी मागूर मासा मांसाहारी आहे. तो मिळेल तो पदार्थ खातो. त्यामुळे त्याच्या शरीरात लोह, पारा असण्याची शक्‍यता असल्याने त्याचे मांस चरबीयुक्त असते शिवाय त्यात मोठ्या प्रमाणात बॅक्‍टेरियाही असतात.असे मासे सेवन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरचा होण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्यावर बंदी आणलेली आहे. 

state government destroyed centers most harmful of thai magur fishes in maharashtra 

टॅग्स :BhandaraIndapur