मतदानावेळी सोशल मीडियाचा वापर नको!

file photo
file photo

मुंबई : समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनो सावधान! मतदान करताना फेसबुक लाईव्ह किंवा छायाचित्र काढल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसे आदेशच देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ याकरिता मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांत 36 विधानसभा मतदारसंघ असून एकूण 1,537 मतदान केंद्रांवर नऊ हजार 991 बुथ आहेत. मुंबई शहरात एकही असुरक्षित बुथ नाही; मात्र एकूण 269 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामुळे सुमारे 40,400 पोलिस, सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत. तसेच, "सीपीएमएफ'च्या 22 कंपन्या, "एसआरपीए'च्या 12 कंपन्या आणि सुमारे 2,700 होमगार्ड तैनात असतील. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता 164 व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे. आचारसंहिता कालावधीत 511 बेकायदा शस्त्रे ताब्यात घेण्यात आली, तर दोन हजार 43 जणांना अजामीनपात्र वारंट बजावण्यात आले आहेत. 

निवडणुकीदरम्यान दहशतवाद विरोधी उपाययोजना राबवण्यात आली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फोर्स वन, क्‍युआरटी, असॉल्ट टीम, दहशतवाद विरोधी पथक आदींना सतर्क करण्यात आले आहे. तसेच, गुप्तचर पथकेही कार्यरत आहेत. 

........ 

10 हजार पोलिसांचे 
टपाली मतदान 
मुंबई पोलिस दलातील 10 हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी नोंदणी केली आहे. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आपले मतदान करता यावे, यासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा पोलिसांसाठी दिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com