अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

महाबळेश्वर : मिझल व रुबेला यांची एकत्रित लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या लसीकरण मोहिमेत सुमारे १००० विद्यार्थ्यांचा टप्पा पार केला असून महाबळेश्वर गिरिस्थान शहरातून एकंदर ४३०० विद्यार्थ्यांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील महाबळेश्वर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. व्ही. तडस यांनी दिली.

महाबळेश्वर : मिझल व रुबेला यांची एकत्रित लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या लसीकरण मोहिमेत सुमारे १००० विद्यार्थ्यांचा टप्पा पार केला असून महाबळेश्वर गिरिस्थान शहरातून एकंदर ४३०० विद्यार्थ्यांचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील महाबळेश्वर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. व्ही. तडस यांनी दिली.

महाबळेश्वर सह सर्वत्र सध्या शासनाने मिझल व रुबेला यांची एकत्रित लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. नऊ महिने पूर्ण असलेल्या अर्भकापासून १५ वर्षे पूर्ण वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्यासह प्रत्येक मुलांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मोहिम हाती घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या मोहिमेतून आठ दिवसात सुमारे १००० मुलांचा टप्पा पार करण्यात डॉक्टरांच्या पथकास यश आले आहे. आज महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले यावेळी ते सांगत होते. सदरची मोहिम ही पाच आठवडे सुरु राहणार असून सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या तसेच शाळा बाह्य मुला व मुलींना या लसीकरणाचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.

आज नगरपालिका संचालित येथील गिरीस्थान प्रशाला व महाविद्यालयात लसीकरण सुरु असताना या लसीकरणासाठी शाळेने देखील हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक देखील शाळेत आवर्जून उपस्थित होते. यावेळी वैद्यकिय अधिक्षक (वर्ग १) डॅा. एन. व्ही. तडस, वैद्यकीय अधिकारी डॅा. एस. व्ही. जगताप, डॉ. दबडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यवस्थित शाळेतील शिक्षकांना व पालकांना सविस्तर माहिती देऊन या लसीकरणाची माहिती दिली. शाळा व्यवस्थापनेच्या वतीने प्राचार्य के. एन. सरपाले यांनी चांगली तयारी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तडस यांनी या लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या जात असल्याची माहिती देत या अफवांवर विश्वास न ठेवता नऊ महिने पूर्ण झालेल्या अर्भकापासून पंधरा वर्ष वयापर्यंत प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहण केले. याबाबत महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात ०२१६८-२६०२४७ वर संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Web Title: Do vaccination without believing rumors