Loksabha 2019 : कल्याण लोकसभा मतदारसंघात लक्षात राहील असे काम करा - एकनाथ शिंदे

रविंद्र खरात 
सोमवार, 1 एप्रिल 2019

कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेना भाजपा आरपीआय युतीचा बालेकिल्ला असल्याचे मागील अनेक निवडणूकमध्ये सगळ्यांनी पाहिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे मागील निवडणूकीमध्ये नवखे असताना त्यांना अडीच लाखाचा मताधिक्याने विजयी मिळाला. तद्नंतर त्यांनी विकास कामे ही केली असून, यापुढे या मतदार संघातुन कोणीही निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही. यासाठी निवडणूकीमध्ये काम करून मताधिक्य द्या असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले. 

कल्याण पूर्व मधील मॉडेल इंग्लिशमध्ये रविवार ता 31 मार्च रोजी शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महापौर विनिता राणे, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, गोपाळ लांडगे, जगन्नाथ पाटील, अण्णा रोकडे, खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार सुभाष भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, कुठलाही व्यक्ती शंभर टक्के काम करू शकत नाही, कल्याण लोकसभा मतदार संघातील प्रश्न डॉ खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत मांडण्याचा प्रयन्त केला. अनेक विकास कामे केली. या विकास कामाच्या धर्तीवर त्यांना 5 लाख मतदान झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नसल्याचे शिंदे म्हणाले. युती होण्यापूर्वी विरोधी पक्षात अनेक जण निवडणूक लढण्यास तयार होते. मात्र शिवसेना भाजपा युती जाहीर होताच अनेकांनी 

निवडणूक मधून माघार घेतल्याने युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला. या निवडणूकीमध्ये 5 लाखांचे मताधिक्य देऊन देशात हा मतदार संघ एक नंबर करा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचे या निवडणूकीमध्ये डिपॉझिट जप्त होईल असे काम करा. की यापुढे या मतदार संघातून कोणी ही निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही कानमंत्र यावेळी शिंदे यांनी दिला.

Web Title: Do well in the Kalyan Lok Sabha constituency says Eknath Shinde