Eknath Shinde: महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोमाने प्रचार करा; शिंदेंच्या नेत्यांना सुचना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची विभागनिहाय माहिती घेतल्याचेही सांगण्यात आले | department wise information about the drought situation in the state was taken
 Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde esakal

Eknath Shinde: मतभेद विसरून महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोमाने प्रचार करण्याबरोबरच शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दिल्या. (eknath shinde meeting with his party netas)

कालच्या बैठकीत नेत्यांनी भाजपविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर आज त्या दृष्टिकोनातून सर्वांची समजूत काढण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले.

 Chief Minister Eknath Shinde
Eknath Shinde: मुख्यमंत्री का आले भाजपच्या दबावाखाली? जाणून घ्या काय आहेत कारणं

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून गेले काही दिवस सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी कालपासून दोन दिवस पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची विभागनिहाय माहिती घेतल्याचेही सांगण्यात आले.

कालच्या चर्चेत बहुतेक नेत्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपल्या हक्काच्या सर्व जागा आपणास मिळायला पाहिजेत, असा आग्रह धरला होता. भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलल्यामुळे तसेच आपल्या काही जागा काढून घेतल्यामुळे लोकांमध्ये पक्षाबद्दल चुकीचा संदेश गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

नेत्यांमधील या नाराजीची आपण दखल घेतल्याचे तसेच पक्षाचा आणि पक्षातील प्रत्येक नेत्याचा सन्मान राखण्याची ग्वाहीही देण्यात आली. महायुतीमधील समन्वय आणि प्रचाराच्या मुद्यांवरही चर्चा झाली. शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी रणनीती बैठकीमध्ये आखण्यात आली.(Coordination and promotion issues within the Grand Alliance were also discussed)

 Chief Minister Eknath Shinde
Eknath Shinde : ''आता त्याग पुरे झाला, मित्रपक्षांना आणखी जागा सोडू नका..'', मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, संजय शिरसाट यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे समजते.(Neelam Gorhe, Ramdas Kadam, Anandrao Adsul, Gajanan Kirtikar, Sanjay Shirsat)

दुष्काळावर चर्चा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात बैठकीत गांभीर्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूक प्रचारात दुष्काळाकडे आणि त्याअनुषंगाने लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, असा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर इक्बालसिंग चहल यांना त्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 Chief Minister Eknath Shinde
Eknath Shinde : शेतकऱ्याच्या मुलाला दिली संधी ; मुख्यमंत्री शिंदे,बाबूराव कदम कोहळीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com