

Mumbai News Bihar Bhavan Gets Port Land At Low Cost
Esakal
नितीन बिनेकर, मुंबई, ता. २० : गेल्या १२ वर्षांपासून गोदी कामगार हक्काच्या घरासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठपुरावा करीत आहेत; मात्र प्रत्येकवेळी नियमांची भिंत पुढे करून त्यांची मागणी बाजूला सारली जाते. पिढ्यान्पिढ्या बंदरात घाम गाळणाऱ्या या कामगारांना आजही डोक्यावर छप्पर मिळालेले नाही: मात्र बिहार भवन उभारण्यासाठी त्याच पोर्ट ट्रस्टची ०.६८ एकर जमीन अवघ्या १५५ कोटीमध्ये बिहार सरकारच्या घशात घातली गेली. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दुटप्पी भूमिकेवर कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला.