फेसबुकवरील पोस्टमुळे डॉक्‍टरला अटक 

फेसबुकवरील पोस्टमुळे डॉक्‍टरला अटक 

मुंबई - समाज माध्यमांवरील वादग्रस्त पोस्टमुळे जातीय व धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी एका डॉक्‍टरला बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला जामीन दिला. 

रवींद्रकुमार तिवारी (47) या केबल व्यावसायिकाने डॉ. सुनीलकुमार निषाद यांच्याविरोधात पार्कसाइट पोलिसांत तक्रार केली होती. निषाद यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती तिवारी यांना एका मित्राने 5 मे रोजी दिली होती. त्यानंतर त्यांनी निषाद यांना फेसबुकवर फॉलो केले. निषाद यांनी भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर व स्वातंत्र्य सैनिकांबाबत काही पोस्ट केल्याचे तिवारी यांना आढळले. त्यावरून निषाद जातीय व धार्मिक तेढ निर्माण करत असल्याची तक्रार तिवारी यांनी पार्कसाइट पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून निषाद यांना बुधवारी अटक केली, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com