सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Sion High Voltage Drama: मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात एका डॉक्टरने रेल्वे स्थानकातील टॉवरवर चढून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
sion High voltage drama

sion High voltage drama

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना घडली आहे. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून एका डॉक्टरने थेट रेल्वे स्थानकातील टॉवरवर चढून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाकडून संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवले. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com