कामचुकार डॉक्‍टरांवर बडगा

Doctor
Doctor

मुंबई - सरकारी आरोग्य केंद्रे, रुग्णालयांत कार्यरत कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एखादा अधिकारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्यास आणि त्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास, त्याला तातडीने सेवेतून निलंबित करण्यात येईल. मध्यंतरी बेफिकीर वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे गर्भवती महिला आणि बालकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना उघड झाल्या होत्या, त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

वरिष्ठांची पूर्वपरवानगी आणि कोणत्याही सबळ कारणाशिवाय कर्तव्यावर हजर नसणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून त्याची वेतनवाढ रोखण्यात येईल. राज्यातील सरकारी रुग्णालयांत डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णावर वेळेत योग्य उपचार न झाल्याच्या असंख्य घटना उघड झाल्या होत्या. काही अधिकारी कर्तव्यावर असूनही गैरहजर राहिल्यामुळे रुग्ण दगावले होते. अपघातांतील जखमी रुग्ण, गर्भवती महिला आणि नवजात अर्भकांवर कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे योग्य उपचार झाले नसल्याचेही आढळून आले होते.

विधिमंडळातील चर्चा
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील औषधांच्या तुटवड्यावर विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी 16 जुलै 2018 रोजी विधिमंडळात चर्चा घडवून आणली होती. या चर्चेत वैद्यकीय अधिका-यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यातून वरिष्ठ अधिका-यांच्या हजेरीत असे प्रकार होणर असतील, तर अशा अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधिमंडळात करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com