5 मिनिटांपूर्वी बाबा खूप चांगलं बोलत होते, पण अचानक....

भाग्यश्री भुवड
गुरुवार, 16 जुलै 2020

5 मिनिटांपूर्वी बाबा खूप चांगलं बोलत होते. त्यांना अचानक हार्टअटॅक आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.

मुंबई : 5 मिनिटांपूर्वी बाबा खूप चांगलं बोलत होते. त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. ते 5 मिनिटं अखेरचे ठरले ही भावना व्यक्त केली आहे मुंबईत गेले अनेक वर्ष डोळ्यांवर उपचार करणारे नेत्र तज्ञ डॉ. आंजनेय आगाशे यांनी. पण, या सर्व परिस्थितीतीवर मात करत आणि आपले 89 वर्षीय वडील गमावले या दुःखाला कवटाळून डाॅ. आगाशे यांनी कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणार्या प्लाझ्मा दानाला सातत्याने करण्याचा चंगच बांधला आहे. 

डाॅ. आगाशे यांनी आतापर्यंत नायर रुग्णालयात दोनदा प्लाझ्मा दान केला आहे. शिवाय, जेव्हा जेव्हा प्लाझ्मा दानाची गरज पडेल तेव्हा तेव्हा डाॅ. आगाशे उत्स्फूर्तपणे दान करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा: निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..

डोळ्यांच्या गंभीर रुग्ण तपासताना 11 मे या दिवशी डाॅ. आगाशे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्या दिवसापासून त्यांना घशात खवखव जाणवू लागली. त्यानंतर, कुटुंबातील आई,बाबा, मुलगा, मुलगी आणि पत्नी सर्वांना संसर्ग झाला. सर्वांनामध्येच कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यात बाबांना 5 दिवस सौम्य ताप होता. त्यामुळे घरीच उपचार सुरू केले. घरीच ऑक्सिजन लावला, पल्स ऑक्सीमीटरने त्यांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली. 20 मे या दिवशी त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. शेवटी बाबांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार, सायन रुग्णालयात त्यांना दुसर्या दिवशी दाखल केले. तीन दिवसांनंतर त्यांची प्रकृती सुधारतेय असं आम्हाला वाटलं. पण, बाबांचं वय जास्त असल्याने आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी त्यांचा आजार बळावले होता. त्यानंतर रविवारी त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि बाबांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने एका क्षणात होत्याचे नव्हते केले. बटण दाबून घरातला लाईट घालवावा असे बाबा आमच्यातून निघून गेले ही खंत डाॅ. आगाशे यांनी व्यक्त केली. 

त्यानंतर, कोरोनावर कोणत्याही पद्धतीने मात करायची असा दृढ निश्चय केला होता. एका जवळच्या डाॅक्टरने प्लाझ्मा दानाबाबत माहिती दिली. त्यानंतर, डाॅ. आगाशे यांनी सायन रुग्णालयात प्लाझ्मा दानाबाबत चौकशी केली आणि अँटीबॉडीज चाचणी केली. ती पाॅझिटीव्ह आली आणि 10 जून या दिवशी त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलासोबत नायर रुग्णालय गाठले. तिथे चाचण्या केल्यानंतर त्यांना पुन्हा 13 जून या दिवशी बोलावलं आणि त्याच दिवशी डाॅ. आगाशे आणि त्यांचा 21 वर्षीय मुलगा प्रथमेशने पहिल्यांदा प्लाझ्मा दान केला. त्यानंतर, 29 जून या दिवशी डाॅ. आगाशे यांनी दुसर्यांदा प्लाझ्मा दान केला आणि नायरमध्ये 50 व्या प्लाझ्मा दात्याचा मान पटकावला. 

हेही वाचा: सलग तिसऱ्या दिवशी तुंबली मुंबई; अत्यावश्यक सेवांची रखडपट्टी.. 

"जेव्हा जेव्हा प्लाझ्मा दानाची गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तो दान करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. प्लाझ्मा दान ही खरंतर कोविडला हरवण्यासाठीची एक संधी आहे.मी 14 जुलैला प्रत्यक्षात नायर हॉस्पिटलमध्ये गेलो नव्हतो. जेव्हा मी डॉक्टरांशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी मला काही काळ थांबा असा सल्ला दिला. पण, सातत्याने प्लाझ्मा दान करणार आहे," असं नेत्र तज्ञ डाॅ. आंजनेय आगाशे यांनी सांगितलंय. 

संपादन : अथर्व महांकाळ 

doctor in mumbai has donated his plasma two times 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor in mumbai has donated his plasma two times