esakal | डाॅक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस; उद्या ओपीडी बंद, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या | Doctor strike
sakal

बोलून बातमी शोधा

doctors strike

डाॅक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस; उद्या ओपीडी बंद, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : 1 ऑक्टोबर पासून केंद्रीय  मार्ड ने पुकारलेल्या संपाचा (Doctor strike) आज तिसरा दिवस असून तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागणयांवर (doctors demand) तोडगा काढण्यास राज्य शासन (mva Government) असमर्थ ठरलेलं आहे. हा संप आता आणखी तीव्र झाला असून सोमवारपासून आपातकालीन सेवेसह ओपीडीही (OPD) बंद राहणार आहेत, त्यामुळे, आता ज्येष्ठ डाॅक्टर्स भूमिका बजावणार आहेत.

हेही वाचा: देशभरातील अॅप्रेंटिसशिप मेळाव्यात; एक लाख उमेदवारांना रोजगार

या सेवा बंद असतील

सर्व बाह्यरुग्ण विभाग(सर्व ओपीडी )

-सर्व स्थिर रुग्ण असणाऱ्या कक्षातील काम

-स्थिर रुग्णासंबंधित सर्व तपासणया

-अपघात विभाग

-अपघात विभागातील रुग्णांच्या तपासण्या

-अत्यावश्यक शस्त्रक्रिया व प्रसूतीगृह

-सर्व लसीकरण विभाग

या सेवा सुरू राहतील

सर्व अतिदक्षिता विभाग

-कोविड अतिदक्षता विभाग

शासनाच्या संपाबाबतच्या उदासीन भूमिकेमुळे मार्ड संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे मार्ड प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, डाॅक्टरांच्या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

स्थिर रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

आंदोलन चिघळत असल्याचे पाहता, पालिका प्रशासनाने वॉर्डमध्ये दाखल प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून रुग्णांच्या अडचणी आणखी वाढतील जेव्हा निवासी डॉक्टर ओपीडी, आयपीडी, अपघात, आपत्कालीन विभाग आणि लसीकरण विभागात त्यांची सेवा देणे बंद करतील.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ५७० नव्या रुग्णांची भर; ३ जणांचा मृत्यू

सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे म्हणाले की, आम्ही सरकारशी बोलण्यास तयार आहोत, पण सरकार आमच्या मागण्यांबाबत उदासीनता दाखवत आहे, त्यामुळे आम्ही आमचा आवाज सरकारच्या मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सेवांवर आणखी कपात करत आहोत. जर आज वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही तर दुपारपासून निवासी डॉक्टर फक्त कोविड वॉर्ड आणि आयसीयूमध्ये आपली सेवा देतील.

सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गांधी जयंतीला गांधीगिरीही करण्यात आली. एवढेच नव्हे तर रविवारी सायंकाळी सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये मेणबत्ती मार्चही काढण्यात आला. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल म्हणाले की, आजपासून ओपीडी, आपत्कालीन विभागांचे कामकाज रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर हाताळतील.

रूग्णांना उपचारामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी, रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल झालेल्या आणि प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. आजपासून रुग्णालयात फक्त आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जातील. गरज नसलेली शस्त्रक्रिया आणखी काही दिवस पुढे ढकलली जाईल. डीएमईआरचे संचालक डॉ दिलीप म्हैसकर यांनी सांगितले की निवासी डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी प्रशासनाला 48 तास अगोदर कळवणे आवश्यक आहे. राज्यात महामारी कायदा लागू आहे आणि जर डॉक्टरांच्या संतापजनक हालचालीमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असेल तर ते स्वतःच महामारी कायद्याअंतर्गत कारवाईसाठी पात्र असतील.

loading image
go to top