esakal | मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ५७० नव्या रुग्णांची भर; ३ जणांचा मृत्यू | corona
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ५७० नव्या रुग्णांची भर; ३ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : दुसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या (corona patients) आज सापडली. आज दिवसभरात कोरोनाच्या 570 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,44,389 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा (corona deaths) मात्र 3 पर्यंत खाली आला आहे. तर 564 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,21,061 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: कल्याण : हातभट्टीवरील 300 लिटर गावठी दारू जप्त; एकाला अटक

मुंबईत अडीचशेपर्यंत खाली गेलेला नवीन बाधित रुग्णांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. आज थेट सहाशेच्या जवळ बाधित रुग्णांचा आकडा पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर याआधी 11 जुलै 555 आणि 8 सप्टेंबर ला रुग्ण सापडले होते. त्यानंतर साधारणता महिन्याभरानंतर पुन्हा एकदादैनंदिन रुग्णसंख्या सहाशेच्या जवळ पोहोचली आहे. 

आज 3 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,125 वर पोहोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1187 दिवस झाला.आज दिवसभरात 41,044 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,04,74,481 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4714 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top