आदिवासी भागातल्या डाॅक्टरांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 'इतक्या' डाॅक्टरांना कोरोनाची लागण..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

आदिवासी पाडे नक्षलग्रस्त भागात कोरोना ड्युटीवर असलेल्या पाच डॉक्टरांना कोरोना लागण झाली आहे.

मुंबई: आदिवासी पाडे नक्षलग्रस्त भागात कोरोना ड्युटीवर असलेल्या पाच डॉक्टरांना कोरोना लागण झाली आहे. या मुळे आदिवासी पाड्यावर आदिवासी समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टरच धोक्यात आले असल्यामुळे सध्या परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वारंवार पीपीई किट , मास्क पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडून केल्या जात असून किमान आता तरी सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी डाॅक्टर्स करत आहेत. 

हेही वाचा: INSIDE STORY: यंदाच्या गणेशोत्सवाला कोरोनाचा प्रचंड फटका; मंडळांच्या अर्थचक्राला यावर्षी लागणार ब्रेक..नक्की वाचा

आधीच आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागात डॉक्टर रुग्ण सेवा करण्यास जाण्याचे प्रमाण कमी आहे . राज्यातील 16 आदिवासी जिल्यामध्ये 281 डॉक्टर रुग्णसेवेचे काम करत आहेत. इतर डॉक्टर या भागात सेवा बजावण्यास तयार होत नाहीत. शिवाय सध्याच्या कोरोना काळात यांची रुग्ण सेवा सतत सुरु आहे. 

राज्य सरकारचे आदिवासी विभाग आणि केंद्र सरकारचे राष्ट्रीय आरोग्य मिशन अशा दोन विभागाअंतर्गत हे डॉक्टर कार्यरत आहेत. सध्या कोरोना केअर सेंटर मध्ये काम करत असताना प्राथमिक सुरक्षेचा देखील अभाव असल्याची व्यथा डॉक्टर मांडतात. त्यात आता पाच डॉक्टर कोरोना बाधित झाल्याने येथील डॉक्टरांची चिंता अजूनच वाढली आहे. 

यावर बोलताना अस्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटना अध्यक्ष डॉ . शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले कि, वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे पालघर जिल्यातील भरारी पथकातील डॉक्टरांना कोविड 19 विषाणूची ड्युटी करतेवेळी कोविड केअर सेंटर मध्ये लागण झाली आहे. किमान आता तरी सरकारने लक्ष देऊन सूरक्षात्मक पीपीई किट्स पुरव्यावा. 

हेही वाचा: "मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

 भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्या, मान्य करून न्याय व्हावा असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री, तसेच आरोग्य मंत्री आणि आदिवासी मंत्री यांना दिले.

doctors are corona positive in aadivasi area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors are corona positive in aadivasi area