esakal | INSIDE STORY: यंदाच्या गणेशोत्सवाला कोरोनाचा प्रचंड फटका; मंडळांच्या अर्थचक्राला यावर्षी लागणार ब्रेक..नक्की वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai festival

कॉर्पोरेट कंपन्याकडून जाहिराती मिळतात. तसेच रहिवाशी , मोठमोठे दुकानदार यांच्याकडून देणग्या मिळतात. त्यावर गणेशोत्सवात होणारा खर्च भागतो.

INSIDE STORY: यंदाच्या गणेशोत्सवाला कोरोनाचा प्रचंड फटका; मंडळांच्या अर्थचक्राला यावर्षी लागणार ब्रेक..नक्की वाचा

sakal_logo
By
उत्कर्षा पाटील- सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबई गणेशोत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो. मोठ्या गणेश मूर्ती हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हल्ली गणेशोत्सवाचे रूप बदलत गेले आहे. अलीकड्च्या काळात गणेशोत्सवाचे आगमन सोहळे रंगू लागले. कॉर्पोरेट कंपन्याकडून जाहिराती मिळतात. तसेच रहिवाशी , मोठमोठे दुकानदार यांच्याकडून देणग्या मिळतात. त्यावर गणेशोत्सवात होणारा खर्च भागतो.

 यामध्ये सजावट, मूर्ती, आगमन विसर्जन मिरवणूक आदींचा खर्च निघतो. तसेच दोन -तीन वर्षापासून आगमन सोहळा मध्ये टी शर्ट घालण्याची क्रेझ आली आहे. त्यासाठी प्रायोजक पुढे आले आहेत. मंडळ टीशर्ट जाहिरात करून त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा करत आहे. यातून लाख ते कोटीच्या घरात मंडळांना उत्पन्न मिळते. परंतु कोरोना या वर्षी सर्व अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. अर्थव्यवस्थेला खिळ बसली असल्याने मंडळांनाही प्रायोजक आणि अन्य मार्गातून उत्पन्न मिळणे कठिण होऊन बसले आहे. 
मंडळांनी वर्गणी न घेण्याचा निर्णय़ यावर्षी घेतला. उत्सव साधेपणाने करणार आहेत. 

हेही वाचा: "मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

मुंबईतील काही महत्वाची गणेशोत्सव मंडळं: 

लालबागचा राजा:

स्थापना -1934
उंची – 14 फूट

काय ख्याती- जागृत गणेश म्हणून देशात ओळख, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर ते मुकेश अंबानी, सर्व मोठे पुढारी दरवर्षी हजेरी लावतात. 
भक्तांकडून मिळणारे दान  -- पाच कोटी, 3.75किलो सोने व 56.7 किलो चांदी 
सामाजिक काम -- रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर, रुग्ण सहाय्यता निधी, डायलेसिस सेंटर,  आत्पकालीन परिस्थिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमदत, 
यावर्षी प्लाझ्मा थेरेपी दान उपक्रम, रक्तदान शिबीर, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 लाख रुपये देणार, 
यावेळी काय -- गणेशोत्सव काळात लालबागच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ न देणे गरजेचे आहे. लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली तरी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ शकते. गर्दी नियंत्रण ठेवणे कठिण आहे. त्यामुळेच यावर्षी उत्सव रद्द करून मंडळ आरोगोत्सव राबवणार आहे, अशी भूमिका मंडळाने घेतली आहे. 

मुंबईचा राजा (गणेश गल्ली):

स्थापना - 1928 
मूर्ती - 22 फूट 

काय ख्याती -- मुंबईतल्या जुन्या मंडळापैकी एक मंडळ, गणेशोत्सव काळात देवाखा साकारण्यात येतात, ते पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात, देखणी मूर्ती 
भक्तांकडून मिळणारे दान --  40 -45 लाख
सामाजिक उपक्रम -- आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आत्पकालीन परिस्थिती सामाजिक भान जपत मदतीसाठी पुढाकार, यावेळी कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 लाख रुपये दिले. 
यावेळी काय -- दरवर्षी 22 फूटाची मूर्ती बनवली जाते. ती यावर्षी सामाजिक भान जपत 4 फूटाची शाडूच्या मातीची मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. मंडळामध्ये कृत्रिम तलावात विसर्जन, मिरवणूक व आगमन सोहळा रद्द, वर्गणी न घेण्याच निर्णय , भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय. 

चिंचपोकळीचा चिंतामणी:

स्थापना - 1919
मूर्ती - 12 ते 15 फूट

काय ख्याती - आगमन सोहळा, वेगवेगळ्या स्वरुपातील मूर्ती, टीशर्टची क्रेझ
भक्तांकडून मिळणारे दान - दोन ते अडीच लाख 
सामाजिक उपक्रम - कार्यालयात आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आत्पकालिन परिस्थिती सामाजिक भान जपत सढळ हस्ते मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  3 लाख 51 हजारची मदत 
यावर्षा काय- आगनन व विसर्जन सोहळा रद्द, मोठ्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना न करता पूजेची चांदीची मूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव करणार, कोरोना योद्धांचा सन्मान, रक्तदान शिबिर,गरजू रुग्णांसाठी रुग्णसाहित्य केंद्राची स्थापना करणार, शासकीय रुग्णाला वैद्यकीय उपकरण देणार 

परळ राजा:
 
स्थापना 1947
मूर्ती -23

काय ख्ताती - उंच गणेश मूर्ती, देखावा
भक्तांकडून मिळणारे उत्पन्न - एक ते दीड लाख 
सामाजिक उपक्रम - आरोग्य शिबिर, अलिबाग येथील वृद्धाश्रमाला मदत, अलिबाग येथे वृक्षरोपण आणि संगोपन उपक्रम, शालेय उपयोगी वस्तू वाटप, मुख्यमंत्री निधी सहाय्यता निधीस 1 लाखाची मदत 
यावर्षी काय - उत्सव साधेपणाने , 3 फूटाची मूर्तीची प्रतिष्ठापना, कृत्रिम तलावात विसर्जन, वर्गणी न घेण्याचा निर्णय
 
जीएसबी किग्ज सर्कल: 

स्थापना - 1965
मूर्ती -14 (शाडूची)

ख्याती - सुवर्ण गणपती (5 दिवसाचा गणपती )
भक्तांकडून मिळणार उत्पन्न - गणेशोत्सव काळात विविध पूजा केल्या जातात. गेल्या वर्षी 66 हजार पूजा झाल्या. 95 टक्के वर्गणी या पूजामाध्यमातून मंडळांना मिळते. त्यावर गणेशोत्सव काळात उपक्रम चालतात. तसेच गणेश भक्तांकडून सोने व चांदीच्या  वस्तू दान केल्या जातात. त्याचे गणपतीला दागिने बनवले जातात. 17 किलो सोने, 350 किलो चांदीचे दागिने गणपतीसाठी बनवले आहेत. )
सामाजिक उपक्रम - कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, पीएम केअर फंडला मदत, उपक्रम, गणेशोत्सव काळात दररोज 15 ते 17 हजार लोकांना अन्नदान , सायन येथील मंडळाच्या हॉल मध्ये कोरोना काळात कम्युनिटी किचन उभारले. 
या वर्षी काय - 14 फूटाची मूर्ती स्थापना करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मूर्ती शाडूची असते. मंडळाच्या मंडपाच कृत्रिम तलावात विसर्जित केली जाईल. ऑनलाईन दर्शन व घरपोच प्रसाद वाटप 

हेही वाचा: पिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...

 "गेल्या वर्षीपर्यंत गणेशोत्सव मोठ्या थाटात आगमन व विसर्जन मिरवणुका निघत होत्या. भाविकांची गर्दी होती. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रायोजक मिळत होते. पण या वर्षी कोरोना महामारीमुळे आर्थिक व्यवस्थेला खिळ पडली आहे. अनेक कंपन्यामध्ये कामगार कपात व पगार कपात करत आहे. आर्थिक दृष्टचक्र सुरू आहे. याचा फटका मंडळांनाही बसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सव इतर उत्सव जे वर्षातून एकदाच येतात त्यासाठी सामान्य माणूस काय आणि मंडळ आपल्या खिशातील थोडासा खर्च बाजूला काढून उत्सव करतील. पूर्वी प्रमाणे थाट नसेल उत्सवामध्ये साधापणा असेल. सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवामध्ये सामाजिक बांधिलकी जपणार असून प्रत्येक मंडळ दोन दिवस सामाजिक व आरोग्य उपक्रम घेणार आहेत". - अॅड. नरेश दहिबांवकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

ganesh festival affected by corona and economy of ganesh mandal