डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; सरकारच्या धोरणांबाबत व्यक्त केला तीव्र संताप

तुषार सोनवणे
Friday, 11 September 2020

राज्यात कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर जात असताना, सरकार कोरोनो योद्धा डॉक्टरांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने, डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

मुंबई - राज्यात कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर जात असताना, सरकार कोरोनो योद्धा डॉक्टरांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने, डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी डॉक्टरांनी राज ठाकरे यांच्याकडे सरकार विरोधात संताप व्यक्त केला. 

कंगनाकडून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा, शेअर केला बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ

कोरोनाशी लढताना डॉक्टरांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. परंतु आपल्या सहकाऱ्याचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यानंतरही सरकारने विमा कवच नाकारल्याबाबत या डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांनी प्रतिक्रीया दिली की,''जून महिन्यात आमच्या एका सहकाऱ्याचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला. ते लॉकडाउनमध्ये सतत सेवा देत होते. आम्ही अर्ज केला असता तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही असं सांगण्यात आलं. तुम्ही स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करत होता आणि याचा कोव्हिडशी काही संबंध नाही असं नाकारलेल्या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. या अतिशय असंवेदनशील आणि निषेधार्ह वक्तव्याबाबत डॉक्टरांनी राज ठाकरेंना सांगितले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: NCBच्या कारवायांनंतर बॉलिवूड ड्रग्स वितरक अंडरग्राऊंड

डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आपल्या व्यथा मांडण्यासाठीच्या बैठकीवेळी मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते.  कोव्हिड योद्ध्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभार्यांने पाहत नाही. सरकार अशा परिस्थितीही भलत्या गोष्टीत व्यस्त आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार दूटप्पी असून कोरोनाची परिस्थिती हातळण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. अशी टीका संंदीप देशपांडे यांनी केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors delegation visits Raj Thackeray