#COVID19 : डॉक्‍टरांना जाणवतोय मास्कचा तुटवडा

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 24 मार्च 2020

परदेशातून आलेल्या संशयित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना मास्क उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.

मुंबई : परदेशातून आलेल्या संशयित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना मास्क उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

कोणतीही सुविधा मिळाली नाही तरी हरकतनाही आम्ही उपचार करणार या भावनेने डॉक्‍टर रूग्णसेवेत कोणतीही हयगय करत नसले तरी अपुरे मास्क हे त्यांच्या तब्येतीसमोरचे आव्हान ठरू नये ही भावना वाढते आहे. प्रारंभी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मास्क अपुरे असल्याची तक्रार तेथील डॉक्‍टर मंडळींनी केली होती,आता सेव्हन हिलस या रूग्णालयात तसे आढळून येते आहे.कूपर रूग्णालयाने सध्या कोरोनाग्रस्तांसाठी सेव्हन हिल्समध्ये डॉक्‍टर पाठवणेसुरू केले आहे.तेथे अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत त्यांना काम करावे लागते आहे.मात्र चौकशी केली असता कूपर रूग्णालयातील अधिष्ठात्यांनी आता या सेवा सुरू झाल्या असून मास्क दिले जात आहेत असे नमूद केले. 

Doctors feel the mask is broken


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors feel the mask is broken