भर दुपारी चिमुकलीवर रानडुक्कराने केला हल्ला पण लॉकडाऊनमध्येही आला देवदूत आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

शेळ्या मेंढ्यांसोबत खेळणाऱ्या चिमुकलीवर भर दुपारी रानडुक्कराने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. मात्र लॉकाडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने मुलीची अवस्था बिकट बनली होती. त्याचवेळी देवदूताप्रमाणे धावून आलेल्या वनाधिकाऱ्यांमुळे त्या चिमुकलीचे प्राण वाचू शकले.

किन्हवली : परिसरातील बर्डेपाडा हद्दीत शेतमाळावर मुक्कामी असलेल्या धनगर वस्तीत शेळ्या मेंढ्यांसोबत खेळणाऱ्या चिमुकलीवर भर दुपारी रानडुक्कराने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. मात्र लॉकाडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने मुलीची अवस्था बिकट बनली होती. त्याचवेळी देवदूताप्रमाणे धावून आलेल्या वनाधिकाऱ्यांमुळे त्या चिमुकलीचे प्राण वाचू शकले.

मोठी बातमीधक्कादायक! 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण 

अनुष्का ठोंबरे (वय 7) असे जखमी मुलीचे नाव असून ती किन्हवली परिसरातील बर्डेपाडा हद्दीत एका शेतात सुमारे वीस दिवसांपासून आपल्या काका, काकींसोबत शेळ्या, मेंढ्यांसह वस्ती करून राहत होती.

नक्की वाचामुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

मंगळवारी(ता.14) दुपारी 12 वाजता बाहेर खेळत असतानाच झुडुपातून अचानक आलेल्या रानडुकराने तिच्या मांडीचे लचके तोडले. तिचे पालक मदतीसाठी याचना करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे रस्त्यावर एकही वाहन नसल्याने अती रक्तस्त्राव होऊन अनुष्का अर्धमेली होऊन पडली होती. त्याचवेळी कर्तव्यावर असलेले किन्हवली-चिखलगाव येथील वनपाल विकास लेंडे व वनरक्षक चिंतामण निंबाळकर यांनी शासकीय गाडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण दुर्दैवाने किन्हवली आरोग्य केंद्रात व शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रेबिजची लस शिल्लक नसल्याने वनपाल लेंडे यांनी तिला तातडीने ठाणे-कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. 

हे ही वाचालॉकडाऊनच्या सुट्टीत 'या' लहानग्याने दिलं सोशल डिस्टेंसिंगचं एकदम भारी उदाहरण, वाचा

ताबडतोब उपचार झाल्याने अनुष्काच्या प्रकृतीत सुधारणा झाली व तिला गुरुवारी (ता.16) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. संचारबंदी सारख्या अवघड प्रसंगी अनुष्कासाठी देवदूत ठरलेल्या त्या वनाधिकाऱयांचे सध्या कौतूक होत आहे.

save girl life by forest officers in mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: save girl life by forest officers in mumbai