
कोरोनाचा संसर्ग झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकही येत नाहीत असं काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही रुग्णालयांकडून सांगण्यात आलं होतं.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकही येत नाहीत असं काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही रुग्णालयांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र उल्हासनगरात भलताच प्रकार घडला आहे. मृतदेहाला अंत्यसंस्कारादरम्यान पाणी पाजणं काही लोकांना चागलंच महागात पडलं आहे.
काय आहे प्रकरण:
उल्हासनगरमध्ये राहणारा ४५ वर्षाचा एक व्यक्ती एका खासगी वाहनावर चालक होता. त्यामुळे त्याला मुंबईला सतत येणं-जाणं करावं लागत होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या व्यक्तीला चक्कर आल्याने चक्कर ते रस्त्यावर पडलेत. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आणि रिपोर्ट येण्याआधीच रुग्णालयानं त्याच्या नातेवाईकांना कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाप्रमाणे त्याचा मृतदेह बांधून दिला होता.
नातेवाईकांनी त्याचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी घरी ठेवलं. अंत्यसंसकाराला बरीच गर्दी झाली होती. मात्र यापुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारादरम्यान मृतदेहाला पाणी पाजलं. दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या मृतदेहाचे नातेवाईक आणि अंत्ययात्रेत सामील झालेल्या तब्बल ७० जणांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे.
यापैकी आतापर्यंत तब्बल १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरातली ही घटना आहे. याआधीही अशीच घटना या परिसरात घडली होती.
हेही वाचा: शाब्बास मुंबई ! मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्रमी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी
relatives feed water to dead body while funeral