बाप रे! मुंबईत बसून पाकिस्तानला देत होता भारतीय लष्कराची माहिती: संशयिताला गुप्तचर विभागानं घेतलं ताब्यात...  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

 


मुंबई: मुंबई पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी कट कारस्थानाचं महत्वाचं केंद्र आहे. काही दिवसांपासून लष्कराचा गुप्तचर विभाग अशाच एका प्रकरणाचा तपास करत होता. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचा पाकिस्तानी लष्कराशी काही संबंध असल्याचा संशय गुप्तचर विभागाला आहे. 

मुंबई: मुंबई पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी कट कारस्थानाचं महत्वाचं केंद्र आहे. काही दिवसांपासून लष्कराचा गुप्तचर विभाग अशाच एका प्रकरणाचा तपास करत होता. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचा पाकिस्तानी लष्कराशी काही संबंध असल्याचा संशय गुप्तचर विभागाला आहे. 

लष्कराच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पोलिासांनी गोवंडीत कारवाई करून बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा पडदाफाश केला. आरोपीकडून पाच सीमबॉक्स व सीमकार्ड जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानातून लष्करी तळांवर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय आहे.

हेही वाचा: मुंबईत तयार होणार भारतातला पहिलावहिला अनोखा पूल..भाईंदर स्थानकाला मिळणार नवी बळकटी.. 

समील अलवारी(38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी समीरला 2017 मध्येही गुन्हे शाखेने अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून लेह लदाख येथील लेह लष्करी तळ, काश्मिर येथील राजोरी, पुंछ या परिसरातील लष्करी तळांवर गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रमांकावरून दूरध्वनी येत होते. दूरध्वनी करणारा व्यक्ती लष्करातील अंतर्गत माहिती विचारत होता. तळात किती जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, किती जण सध्या विलगीकरणार आहेत, किती संख्याबळ आहे. याबाबतची माहिती घेतली असता हे दूरध्वनी मुंबईतून येत असल्याची माहिती जम्मू काश्मिर पोलिस व लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली.

त्यानुसार तीन दिवसांपूर्वी ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून पोलिस गेल्या तीन दिवसांपासून संशयीत आरोपीचा शोध घेत होते. एका खासगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मदतीने तपास केला असता हे दूरध्वनी गोवंडी परिसरातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवंडी येथे छापा टाकून समीरला अटक करण्यात आली.

 त्याच्याकडून 223 सीमकार्ड व पाच सीमबॉक्स हस्तगत करण्यात आले. याबाबत अधिक तपास केला असता आखाती देश व पाकिस्तानातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशी दूरध्वनी अथवा व्हिओआयपी दूरध्वनी या बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले जातात. 

हेही वाचा: कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

 

सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्यांची नोंदही होत नव्हती. तसेच ज्या व्यक्तीला दूरध्वनी केले जातात त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे. त्यामुळे या बेकायदा यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांमधील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथक तपास करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

indian RAW team caught telephone exchange accused in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian RAW team caught telephone exchange accused in mumbai read full story