उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांचे वाईट कृत्य; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांचे वाईट कृत्य; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

भिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील एका खाजगी दखान्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर विरोधात मंगळवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 30 जुलै रोजी शहरातील कोंडाजी वाडी येथे राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची व तिच्या आईची तब्बेत बरी नसल्याने दोघीही गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान याच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींनाही तपासून व उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे 31 जूलै रोजी मुलीच्या आईने तिच्या सोबत 10 वर्षाच्या मुलाला सोबत पाठवले होते.

दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान डॉ बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही. तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले व दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील कामानिमित्त बाहेर पाठवून मुलीच्या सोबत आलेल्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले होते. या दरम्यान दवाखान्यात कुणीही नसल्याचा फायदा घेत  या डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला. सदर प्रकार पीडित मुलीने आपल्या मावशीला सांगितला. त्यामुळे तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून सदरचा प्रकार कथन केला.

या प्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात  डॉक्टरबाबत तक्रार केली असता पोलिसांनी डॉक्टर विरोधात भादंवि.कलम 354 ( ए ) , 376 (2)( इ) , 376 (सी) ( डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कालामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे यांनी दिली आहे.

-----------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com