दीड महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळासाठी 'त्या' डॉक्टरांनी घेतली मोठी रिस्क, बाळ तर वाचलं पण डॉक्टर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाचा संसर्ग फक्त वयानं मोठ्या असणाऱ्या लोकांनाच होतो असं नाही. अगदी नवजात शिशुलाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर येतायत. 

मुंबई: सध्या कोरोना व्हायरसची भीती देशातल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. कोरोना व्हायरसनं लाखो लोकांना ग्रासलं आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग फक्त वयानं मोठ्या असणाऱ्या लोकांनाच होतो असं नाही. अगदी नवजात शिशुलाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर येतायत. एका दीड महिन्याच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे तरीही डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिलंय. 

या दीड महिन्यांच्या बाळाला सर्दी खोकला असल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली होती. मात्र त्या बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं डॉक्टरांना लक्षात आलं होतं. मात्र हे बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शस्त्रक्रिया करणं हे जोखमीचं काम होतं. मात्र डॉक्टर या बाळासाठी देवदूत बनून आले. 

हेही वाचा: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर, पण...

अशी झाली शस्त्रक्रिया: 

दीड महिन्यांच्या या बाळाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र  उपचारादरम्यान रात्री उशिरा अचानक या बाळाची प्रकृती खालावली. त्यात या बाळाच्या फुफ्फुसाला सूज आल्यानं त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि या रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमनं या बाळावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना.. जमावबंदी नव्हे तर साड्यांची खरेदी महत्वाची! पनवेलमध्ये घडला हा अजब प्रकार..

सायन रुग्णालयाच्या ६ डॉक्टरांच्या टीमनं या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात बाळाच्या जीवाची जोखीम होती. डॉक्टरांनी बाळाचे प्राण वाचवण्यासाठी त्याला ऍनेस्थेशिया देऊन त्या बाळावर पहाटे ३ वाजता यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे या बाळाचे प्राण वाचले. मात्र बाळ कोरोनाग्रस्त असल्याने आता डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. मात्र या बाळासाठी देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांना सलाम.   
doctors save life of 1.5 months child who is corona positive  read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors save life of one and half months child who is corona positive read full story