esakal | निवासी डॉक्टरांच्या शुल्काचा वाद मिटला | Doctors strike
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

निवासी डॉक्टरांच्या शुल्काचा वाद मिटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विविध मागण्यांसाठी नुकतेच संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांची (doctors strike) मागणी अखेर राज्य सरकारने (mva Government) मान्य केली आहे. बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णयही (GR) जारी करण्यात आला. त्यामुळे निवासी डॉक्टर आणि राज्य सरकारमध्ये शुल्कासंदर्भात (Fees issue) सुरू असलेला वाद मिटला आहे. यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात निवासी डॉक्टर चार दिवस संपावर गेले होते.

हेही वाचा: पवई तलावाभोवती पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक गॅबियन तंत्रज्ञानाचा BMC कडून प्रयोग

सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे म्हणाले की, निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेल्या शैक्षणिक शुल्क माफीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन दोन दिवसांत पूर्ण केले. तसेच कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी दिलेल्या योगदानासाठी सरकारने प्रोत्साहन निधी म्हणून एक लाख २१ हजार रुपये दिले आहेत. हा निधी त्यांना ऑक्टोबर आणि मार्चमध्ये दोन हप्त्यांमध्ये दिला जाईल.

loading image
go to top