esakal | पवई तलावाभोवती पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक गॅबियन तंत्रज्ञानाचा BMC कडून प्रयोग | Powai Lake
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle Track

पवई तलावाभोवती पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक गॅबियन तंत्रज्ञानाचा BMC कडून प्रयोग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पवई तलाव (Powai lake) परिसरात पर्यावरणपूरक (Ecofriendly) गॅबियन तंत्रज्ञानाने सायकल ट्रॅक (cycle track) बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तलावातील, तसेच परिसरातील जैवविविधतेवर (biodiversity) कोणताही परिणाम होणार नाही. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही (Expert Guidance) घेण्यात येत आहे, असा दावा महापालिकेचे (bmc authorities) अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केला.

हेही वाचा: मुंबई : प्रत्येक महाविद्यालयात‘आयडॉल’चे उपकेंद्र

पवई तलावाभोवती उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकसाठी काही भागात भराव टाकण्यात येणार असल्याचा आरोप भाजपने केला. याबाबत भाजप खासदार मनोज कोटक यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रशासनाने आपली भूमिका मांडली. पालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने सर्व पैलूंचा विचार करून गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता जाळीमध्ये दगडांची रचना केली जाते. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक हानी होत नाही. या अंथरलेल्या दगडांमध्ये असलेल्या अंतरामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, तसेच त्यात लहानसहान वनस्पती मूळ धरू शकतात, परिणामी मातीची धूप होत नाही. तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.


नियमांचे उल्लंघन नाही!

पवई तलाव हा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग नाही. तलाव क्षेत्र हे पालिकेच्या अखत्यारित आहे. तसेच ते कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक वन क्षेत्रासाठी राखीव देखील नाही, तसेच तलावाचे क्षेत्र पाणथळ क्षेत्रात मोडत नाही. त्यामुळे पवई तलाव, परिसराचा विकास करताना कोणत्याही नियमांचे उल्‍लंघन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असाही दावा प्रशासनाने केला आहे.

loading image
go to top