प्रभागात कुत्र्यांचे निर्बीजीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - शहरातील गल्लीबोळांमधील भटक्‍या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची जबाबदारी प्रत्येक प्रभागात खासगी संस्थेवर सोपवण्यात येणार आहे. सध्या मुंबईत अवघ्या सहा संस्था हे काम करतात.

मुंबईतील रस्त्यांवर ९५ हजार ७१४ भटकी कुत्री आहेत. त्यांचे निर्बीजीकरण करून संख्या मर्यादित ठेवण्यात येते. पाच वर्षांत ४१ हजार ३८५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण पालिकेने केले आहे. तीन वर्षांत २३ हजारांच्या आसपास कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. तरीही भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे निर्बीजीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. निर्बिजीकरणासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा नाही.

पूर्वी श्‍वानांच्या निर्बीजीकरणाचे काम चार संस्था करत होत्या. नोव्हेंबरपासून पालिकेने दोन नव्या संस्थांची नियुक्ती केली. दोन पाळ्यांत भटकी कुत्री पकडण्याचे काम या संस्था करतात. हे बळही अपुरे असल्याने आता प्रत्येक प्रभागात संस्थांची नियुक्ती करण्यात येईल. आता मुंबईत २४ संस्था निर्बीजीकरणाचे काम करतील. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने महासभेत सादर केली आहे.

Web Title: Dog breeding