Dombivali News : अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह

कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत गुरुवारी रात्री एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
Death Body News
Death Body Newsesakal

डोंबिवली - कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत गुरुवारी रात्री एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना बाजूच्या झुडपात काही जळत असल्याचे पोलिसांना दिसले.

घटनास्थळी जाऊन पाहिले असता एका व्यक्तीचा मृतदेह जळत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळालगत असलेल्या अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना रुळा लगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला. याबाबत रेल्वे पोलिसांनी टिळक नगर पोलिसांना माहिती दिली.

टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. सुरवातीला मृतदेह पालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालय येथे पाठविण्यात आला. त्यानंतर सदर मृतदेह मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.

35 ते 40 वर्षाच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com