डोंबिवलीत 'मै हूं डॉन' च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Dombivali Thief
Dombivali Thiefsakal media

डोंबिवली : चाळीतील घरांना (Dombivali chauls) लक्ष करून तो घरातील मोबाईल चोरून (mobile thief) पसार व्हायचा. चोरलेला फोन बंद न करता त्यावर कोणी कॉल केला तर 'मै हूं डॉन' असे बोलून तो चॅलेंज देत होता. या डॉन च्या मुसक्या आवळत विष्णुनगर पोलिसांनी (police) त्याला सोमवारी अटक (arrest) केली.

Dombivali Thief
शिक्षक दिनीच शिक्षकांचे मुंबई उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण

भांडुपच्या हनुमाननगरमध्ये राहणारा भुरटा चोर

सतीश वाळके (वय 28) याने चोरीसाठी ठाणे, कल्याण डोंबिवलीतील चाळीतील घरांना लक्ष केले होते. घराचा उघडा दरवाजा पाहून जवळपास असलेला मोबाईल तो घेऊन पळून जायचा. एवढेच नाही तर चोरलेला मोबाईल स्विच ऑफ न करता तसेच सुरू ठेवत होता. त्यावर हरवलेल्या नागरिकांनी संपर्क साधला असता तो 'मै हूं डॉन' असे बोलून तो मोबाईल शोधून काढण्याचे चॅलेंज देत असे. 12 मे ला डोंबिवली पश्चिमेत राहणारे दयानंद शर्मा यांच्या घरातील मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर आणखी एका साक्षीदारानेही अशाच पद्धतीने त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले.

दाखल तक्रारीनुसार विष्णुनगरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस नाईक बी. के. सांगळे यांच्या पथकाने शोध सुरू केला. सांगळे यांचे सतीश याच्या सोबत एकदा व्हिडीओ कॉल वर बोलणे देखील झाले तेव्हाही त्याने हेच चॅलेंज पोलिसांनाही दिले. त्याच्या कॉल वरून तांत्रिक बाबीद्वारे शोध घेतला असता तो वाशीम येथे असल्याचे दाखवत होते. मात्र भांडुप येथे पुन्हा तो चोरीच्या उद्देशाने येताच गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com