
डोंबिवली: अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर २७ वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती.