Dombivali Crime : सधन घरातील दोघी बहिणी हौस-मौजेसाठी बनल्या चोर

ज्वेलर्स दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन बहिणींना महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या.
Crime
CrimeSakal

डोंबिवली - ज्वेलर्स दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन बहिणींना महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. निशा (31) आणि रेश्मा पुनवाणी (33) अशी या बहिणींची नावे आहेत. त्या उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या आहेत. या दोन्ही बहिणी सधन घरातील असून हौस-मौज करण्यासाठी लागणारा खर्च भागवण्याकरिता या दोघींनी चोरीचा मार्ग पत्करल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आल्यानंतर पोलिसही अवाक् झाले आहेत.

कल्याण पश्चिमेकडील नारायणवाडी परिसरात असलेल्या एम. एम. शंखलेशा ज्वेलर्समध्ये काही दिवसांपूर्वी दोन अनोळखी महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. कामगाराने त्यांना बॉक्समधील अंगठी दाखविली.

अन्य कामगार इतर ग्राहकांना दागिने दाखवत असताना या महिलांनी बॉक्समधील 4.800 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी गुपचूप चोरली आणि त्या अंगठीच्या ठिकाणी नकली अंगठी ठेऊन दुकानातून काहीही खरेदी न करता दोघी चोरट्या दुकानातून चालू पडल्या. कालांतराने हा प्रकार लक्षात येताच दुकानातील कामगारांनी त्या महिलांचा शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.

या घटनेनंतर परिसरातील सोने-चांदीच्या व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. दुकानाच्या मालकीण विमल सुमेरमल शंखलेशा (49) यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दुकान व आसपासच्या परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्या महिलांचा शोध सुरू केला.

या दोन्ही महिला दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सुचित ठिकेकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन्ही महिलांचा शोध सुरू केला.

अखेर पोलिसांनी निशा आणि रेश्मा पुनवाणी या दोन्ही बहिणींना उल्हासनगर येथून बेड्या ठोकल्या. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोघींना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघींनी आतापर्यंत किती ज्वेलर्स दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन चोऱ्या केल्या आहेत याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com