esakal | डोंबिवलीत भूखंडावरून वाद; विष्णूनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल | Dombivali
sakal

बोलून बातमी शोधा

The youth was beaten to death by goons due to file police complaint in pimpri.jpg

डोंबिवलीत भूखंडावरून वाद; विष्णूनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील (Dombivali West) एका सोसायटीमधील जागेवरून (society land) माजी नगरसेवक रणजित जोशी (Ranjit joshi), विकासक संदीप परब (sandeep parab) आणि सोसायटीधारक यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात (vishnu nagar police station) परस्पर विरोधी तक्रार (police complaint) दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: नवीन पनवेल : विधी सेवा जनजागृती शिबिर

डोंबिवली पश्चिमेत देवी चौक परिसरातील प्रभात सोसायटीच्या आवारात एक प्लॉट आहे. हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी हॅप्पी होमला देण्यात आला असल्याचे हॅप्पी होमचे मॅनेजर तथा विकासक संदीप परब यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड लावला होता. हा बोर्ड काढल्यामुळे विकासक संदीप व माजी नगरसेवक रणजित जोशी हे सोसायटी धारकांना बोर्ड का काढला हे विचारण्यास गेले होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन सुरेश देशपांडे व त्यांच्या मुलाने ही जागा सोसायटी मालकीची असून त्यांना कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. या कारणावरून दोन्ही गटात वाद झाले.

याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक रणजित जोशी यांचेही नाव असून, या प्रकरणाबद्दल ते म्हणाले, त्या सोसायटी मधील एका मेम्बरला तो प्लॉट अलर्ट झाला होता. त्याने संबंधित विकासकाला त्याची एनओसी दिली होती. तेथील लोकांनी विकासकाचा बोर्ड हटविला होता. त्यामध्ये मी ही काही प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करत होतो. गुंतवणूक करण्याआधी विचारपूस करावी म्हणून मी तेथे गेलो होतो. मात्र तिथे चेअरमनच्या मुलाने आमच्यासोबत आवाज वाढवून बोलण्यास सुरवात केली. त्यामुळे आम्ही तेथून निघून आलो व पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर त्यांनीही दुसऱ्या दिवशी जाऊन तक्रार दाखल केली आहे.

loading image
go to top