Video Viral : झोपाळ्यावर बसण्यावरुन वाद; अल्पवयीन मुलांनी चाकूने केला हल्ला

काळा तलाव उद्यान परिसरातील घटना
viral video
viral videoSakal

डोंबिवली - कल्याण मधील काळा तलाव परिसरातील उद्यानात झोपाळ्यावर बसण्यावरुन दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी एका 27 वर्षीय व्यक्तीसह दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत चाकूने वार देखील केले आहेत.

या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

viral video
Ahmednagar Crime : भर लग्नात पोलीस आले अन् लग्न लागण्याआधी नवरदेव पोहचला ठाण्यात; काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथील उद्यानात अर्शद शेख हे आपल्या कुटूंबासह फिरण्यास आले होते. उद्यानातील झोपाळ्यावर बसण्यावरुन काही अल्पवयीन मुलांनी अर्शद यांच्याशी वाद घातला. सदर मुलांनी अर्शद यांना काळा तलावाच्या मुख्य गेटवर अडविले. त्यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले.

अल्पवयीन मुलांनी बांबूने त्यांना व दोन मुलांना मारहाण करत चाकूने वार देखील केले आहेत. या घटनेत 3 मुले गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल करत याचा अधिक तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com