पाय लागला एकाला, दुसऱ्यांनीच दिला चोप; तरुणाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

डोंबिवली रेल्वे स्थानकातून जात असताना एका प्रवाशाला 27 वर्षीय तरुणाचा पाय लागला. तरुणाने माफी मागितल्यावर सदर प्रवासी निघून गेला.

Dombivali Crime : पाय लागला एकाला, दुसऱ्यांनीच दिला चोप; तरुणाला बेदम मारहाण

डोंबिवली - डोंबिवली रेल्वे स्थानकातून जात असताना एका प्रवाशाला 27 वर्षीय तरुणाचा पाय लागला. तरुणाने माफी मागितल्यावर सदर प्रवासी निघून गेला. मात्र पाठीमागून चालणाऱ्या दोघांनी सदर तरुणाला या कारणावरुन बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. सागर भिसे असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात सागर हा राहण्यास आले. बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान तो लोकलने प्रवास करुन डोंबिवली स्थानकात उतरला होता. जिना चढून तो जात असताना एका प्रवाशाला त्याचा पाय लागला. त्यावर माफी मागितल्याने तो प्रवासी पुढे निघून गेला. यावेळी सागर याच्या पाठीमागून येणाऱ्या दोघांनी त्याला हटकले. त्याच्या शी हुज्जत घातली.

सागरने त्यांना मी माफी मागितली, आमचे भांडण मिटले आहे. तुम्ही का मध्ये बोलता असे बोलले असता त्यांनी सागरला मारहाण केली आहे. या मारहाणीत एका व्यक्तीच्या हातातील कडे सागरच्या हाताला आणि ओठाला लागले आहे. मारहाण करणाऱ्या दोघांनी घटना स्थळावरुन पळ काढला आहे. नंतर सागरने डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाणे गाठत दोघा व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून पोलिस त्याद्वारे पुढील तपास करत आहेत.