डोंबिवली : रिक्षात विसरलेला मोबाईल मिळाला डॉक्टरांना परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : रिक्षात विसरलेला मोबाईल मिळाला डॉक्टरांना परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रुग्णालयात जाण्याच्या घाईगडबडीत डॉ. श्वेता सिंग रिक्षातच आपला मोबाईल विसरल्या. मोबाईल विसरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन स्विच ऑफ आला. त्यांनी डोंबिवली वाहतूक शाखेत संपर्क साधत याची माहिती दिली. तत्काळ सूत्रे हलवून वाहतूक पोलिसांनी डॉ. सिंग यांच्या मोबाईलचा शोध घेत त्यांच्याकडे सुपूर्द केला. वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच हरवलेला फोनही वाहतूक पोलिसांनी मिळवून दिल्याने कौतुक केले जात आहे.

डोंबिवलीतील बाज आर. आर. रुग्णालयात डॉ. सिंग या वैद्यकीय अधिकारी आहेत. बुधवारी सकाळी 10 च्या दरम्यान नेहरू मैदान येथून त्यांनी रुग्णालयात जायला रिक्षा पकडली. रिक्षातून उतरताना त्या मोबाईल रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वरून त्यांनी त्वरित आपल्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन स्विच ऑफ आला. वेळ न दवडता त्यांनी डोंबिवली वाहतूक शाखेत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी, गुरू छाया सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

हेही वाचा: पुणे : सकाळी गैरसोय; दुपारी दिलासा

पंरतु कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. डॉ.सिंग यांनी केलेली रिक्षा व रिक्षा चालकाच्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला व नंतर तो डॉ. सिंग यांच्या ताब्यात देण्यात आला.

loading image
go to top