Dombivali News : लेक खाडीकिनारी खेळत असताना पाण्यात पडली; वडील वाचवायला गेले तेही बुडाले

डोंबिवलीतील ह्र्दयद्रावक घटना! दुपारी वडिलांसोबत खाडी किनारी खेळायला गेलेली 2 वर्षाची चिमुरडी खेळता खेळता अचानक पाण्यात पडली.
Dombivali News : लेक खाडीकिनारी खेळत असताना पाण्यात पडली; वडील वाचवायला गेले तेही बुडाले

डोंबिवली - दुपारी वडिलांसोबत खाडी किनारी खेळायला गेलेली 2 वर्षाची चिमुरडी खेळता खेळता अचानक पाण्यात पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे पाहून वडिलांनी देखील पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले आहे. डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर येथील गणेश घाटावर दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

बाप लेकीचा शोध अद्याप लागलेला नसून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अनिल सुरवाडे (वय 40) आणि ईरा सुरवाडे (वय 2) असे बेपत्ता बापलेकीचे नाव आहे. खाडी किनारी असलेल ईरा चे खेळणे बघून आईचे हृदय पिळवटले.

डोंबिवली पश्चिम येथील राजूनगर येथील खाडीकिनारी शनिवारी दुपारी एक दुःखद घटना घडली आहे. याच परिसरात राहणारे अनिल हे आपली 2 वर्षाची लेक ईरा हिच्यासोबत गणेशघाट परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी 1 च्या सुमारास ईरा खाडी किनारी खेळत होती. तिने आपली चप्पल व आपला टेडीबेअर तिथेच बाजूला ठेवला. पाण्यात खेळण्यासाठी ती घाटाच्या एक एक पायऱ्या उतरत गेली. अचानक तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली.

ईरा पाण्यात पडलेली पाहून वडील अनिल यांनी देखील क्षणाचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. त्यांनी यावेळी बचावासाठी आवाज देखील दिला. त्यांना पाहून स्थानिक तरुण चांद शेख हा त्यांना वाचवण्यासाठी धावला त्याने पाण्यात काही अंतरावर अनिल यांचा हात पाहिला होता. त्याने प्रयत्न केले मात्र तोपर्यंत दोघे बुडाले. त्याने याबाबत तात्काळ विष्णुनगर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलास देखील पाचारण करण्यात आले. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडी परिसरात 5 किमी अंतरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत. सायंकाळी 4 च्या दरम्यान बचावकार्य थांबविण्यात आले.

दुपारी 3 च्या सुमारास बेपत्ता नागरिकांच्या घरच्यांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी गणेश घाटावर धाव घेतली. आपल्या मुलीची चप्पल व टेडीबेअर तिथे पाहून आईने एकच हंबरडा फोडला. सुरवातीला खाडीत नक्की कोण पडले याची माहिती मिळत नव्हती. एक व्यक्ती मुलीसह खाडी किनारी जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने नंतर त्यांची ओळख पटली.

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसेच मुलगी व वडील बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पुन्हा खाडी परिसर, मोठागाव परिसरात वडील लेकीचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com