
डोंबिवली : जमिनीच्या वादातून (Land Quarrel) कल्याण ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबास (farmer family beaten case) डोंबिवलीतील माजी नगरसेवकाने (corporator) जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मारहाणीची घटना घडून 22 तास उलटले तरी शीळ डायघर पोलीस (shil-dighar police) ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झालेली नाही. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) हे शेतकरी कुटुंबासह पोलीस ठाण्यात 6 तास बसून होते तरीही गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात असून आत हे कुटुंब न्यायालयात दाद मागणार आहे.
कल्याण ग्रामीण भागात दहिसर मोकाशी, मोकाशी पाडा आणि दहिसर मोरी अशा तीन गावांची मिळून 285 एकर जमीन आहे. या जागेचे प्रतिनीधीत्व पूर्वी 11 जण करीत होते, आता त्यात 6 सदस्यांचा समावेश आहेत. ही जमिन विक्री प्रकरणी पूर्वी एका व्यावसायिकासोबत काही सदस्यांचा व्यवहार झाला होता. मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. याच जमिनीच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप मोकाशी पाडा येथे राहणारे एकनाथ मोकाशी यांनी केला आहे.
यातूनच गुरुवारी रात्री डोंबिवलीतील माजी नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या सोबत आलेल्या नागरिकांनी माझ्यासह माझी दोन मुले प्रशांत आणि देविदास यांना जबर मारहाण केली आहे. तसेच सुनांवरही या हल्लेखोरांनी हात उचलला असल्याचे एकनाथ यांनी सांगितले. मारहाण झाल्यानंतर एकनाथ हे कुटूंबासह शीळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठविले पण त्यानंतर कोणतीही तक्रार घटनेला 22 तास उलटूनही दाखल केली गेलेली नाही.
याप्रकरणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे शुक्रवारी दुपारी शेतकरी कुटूंबासह पोलीस ठाण्यात दाखल झाले. 6 तास प्रतीक्षा करून सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याशी चर्चा होऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रापेक्षा बिहार बरा - आमदार राजू पाटील
तक्रारदार यांची मेडिकल केली गेली, म्हणणे ऐकून घेतले या प्रक्रियेनंतर तक्रार दाखल करून घेणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र 22 तास उलटूनही गुन्हा दाखल नाही. तक्रारदार आरोपीना ओळखत आहेत, तरी आरोपींची नाव न सांगता तक्रार दाखल करा असे पोलीस सांगतात हा कुठला न्याय आहे. राज्यात हेच चालणार असेल तर यापेक्षा बिहार बरा असे माझे मुख्यमंत्री यांना सांगणे आहे. महिलांवर अत्याचार होऊनही गुन्हा दाखल होत नसेल तर बांगड्या घालून घरात बसावे असे खडे बोल आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहेत. सत्ता हातात आहे तर कोणी आमच्या लोकांवर अन्याय करू शकत नाही त्यांच्यावर न्यायालय असून तेथे भूमिपुत्र दाद मागतील.
बाबा एकनाथ यांना भेटायला काही माणसे आली होती. ती आधीही दोनदा येऊन गेले होते. त्यांच्यात वादावादी होऊन त्यांनी घरातील बाबा, दिर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही महिला बाहेर आलो. त्या माणसांनी मद्यपान केले होते, आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली व लागत करण्याचा देखील प्रयत्न केला. इथे महिला सुरक्षित नाहीत, कायद्याचा धाक कोणाला नाही. राजकारणी लोकच असे वागू लागले तर काय करायचे. पोलीसही सहकार्य करत नाही. महाराष्ट्रात हे व्हावे हे निंदनीय आहे असे दर्शना व सविता मोकाशी यांनी सांगितले. याप्रकरणी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.